२५ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:07 AM2021-04-20T04:07:33+5:302021-04-20T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०२५ पर्यंत २५ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी ९ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२५ पर्यंत २५ हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी ९ हजार ३०५ मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. २ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रगतिपथावर आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमाने शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होईल.
ग्रीन हाऊस गॅसेसचा परिणाम कमी करणे, शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ई-व्हेईकलचे धोरण राबविण्यात येत असून, राज्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार असून, यासाठी ९ हजार ४५३ कोटी खर्च करण्यात येतील.
थकीत वीज बिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास त्यांना राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी देण्यात येईल. ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या जवळपास ६६ टक्के, म्हणजे ३० हजार ४११ कोटी रक्कम माफ केली जाईल.
कृषीपंप वीज जोडणी धोरण ही योजना राबविण्याकरिता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये निधी भागभांडवलाच्या स्वरूपात दिले जातील.
--------------