Join us

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:30 PM

आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.

 राज ठाकरेंच्या मशीदीवरुन भोंगे हटविण्याच्या विधानावरुन इम्तियाज जलील म्हणाले की, गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो आहे असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. परंतु लोकं हुशार झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे विचार करुन बोलतील तर चांगल होईल असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिला आहे. 

... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण

देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझौता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

जगभरातून भारतात येणाऱ्या लोकांना विमानतळावर व्हिसा विचारला जातो. मात्र पाकिस्तान, बांगलादेशातून अनधिकृतपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांचं काय, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. भविष्यात युद्ध झाल्यास आपल्या सैन्याला देशातच लढावं लागेल. देशातल्या शत्रूंपासून आपल्याला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलून द्यायलाच हवं. यासाठी माझा मोदी सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. 

दरम्यान, अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...

टॅग्स :राज ठाकरेमनसेऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनइम्तियाज जलीलमहाराष्ट्र सरकारमुंबईमहाराष्ट्र