लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा संपून एव्हाना उत्तरेकडील थंडीच्या लाटेने महाराष्ट्रावर चाल केलेली असते. मात्र, यंदाचा हिवाळा यास अपवाद ठरत आहे. कारण सातत्याने निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. परिणामी ऐन हिवाळ्यात ऊन-पावसाचा खेळ रंगला असून, आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.
येथे पडणार पाऊस१९ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. २०, २१ आणि २२ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
रब्बी पिकांना फायदा ज्या शेतकऱ्यांनी पिके काढलेली नाहीत त्यांनी काढणीला आलेली पिके काढून घ्यावीत. भाजीपाल्याची, फळांची अशी काढणीला आलेली पिके खराब होऊ शकतात. हरभरा, गहू यासारख्या रब्बीच्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. हा पाऊस २३ नोव्हेंबरपर्यंत ठिकठिकाणी कायम राहणार आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामान तज्ज्ञ
ऐन हिवाळ्यात पडणारा हा पाऊस रब्बी पिकांना पोषक असून (पान ९ वर)