मनोज गडनीस, मुंबई - अवघ्या दीड वर्षांपूर्वी देशांतर्गत विमान सेवा सुरू करणाऱ्या अकासा विमान कंपनीने मोठी झेप घेत तब्बल नव्या १५० विमानांची ऑर्डर दिली आहे. हैदराबाद येथे सुरू असलेल्या एअरशो कार्यक्रमादरम्यान कंपनीने ही ऑर्डर दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या नव्या विमानांच्या खरेदीसाठी कंपनीने बोईंग कंपनीला प्राधान्य दिले असून बोईंग कंपनीची ७२७ मॅक्स या जातीची विमान खरेदी करण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने काही विमानांची खरेदी केली होती. या नव्या १५० विमानांच्या खरेदीमुळे आगामी आठ वर्षांत कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या २२६ इतकी होणार आहे. सध्याच्या घडीला कंपनीच्या ताफ्यात एकूण २२ विमाने असून देशातील विविध मार्गांवर ही विमाने उड्डाण करतात. तर, सरत्या वर्षात कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी देखील परवानगी मिळाली असून लवकरच कंपनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील विमान सेवा सुरू करणार आहे.