Join us

पश्चिम लोकलमधील वातानुकूलित डबे वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वे मुंबई उपनगरीय मार्गावरील वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम रेल्वे मुंबई उपनगरीय मार्गावरील वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईकरांना वातानुकूलित लोकलमधून प्रवासाला पसंती दिली आहे. या सर्वेक्षणात प्रवाशांना २० प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये ७० टक्के प्रवाशांनी मुंबई उपनगरीय मार्गावर वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्याची विनंती केल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सांगितले.

आलोक कंसल यांनी सांगितले की, वातानुकूलित लोकलसाठी आम्ही काम करत आहोत. सरकारच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) आणि केंद्र सरकारच्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) यांच्याशी याविषयी चर्चा करत आहोत. वातानुकूलित नसलेले डबे काढण्यात येणार नाहीत. यापुढे बहुतेक लोकल वातानुकूलित असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम रेल्वे भारतीय कोच फॅक्टरीशी वातानुकूलित आणि वातानुकूलित नसणारे डब्यांना जोडण्याशी संबंधित तांत्रिक घटकांसाठी चर्चा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चौकट

हायब्रिड लोकल सुरू करण्याची योजना

पश्चिम रेल्वेचे अधिकारी हायब्रिड लोकल सुरू करण्याची योजना आखत आहेत. ज्यामध्ये वातानुकूलित आणि वातानुकूलित नसणारे असे दोन्ही डबे असतील. येत्या काही वर्षांमध्ये, सर्व लोकलमध्ये सध्याचे वातानुकूलित नसणारे डबे वातानुकूलित असतील.