"प्रतीक्षा संपली! वातानुकूलित लोकल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:08 AM2017-12-25T04:08:48+5:302017-12-25T04:09:26+5:30

बहुप्रतीक्षित वातानुकूलित लोकल सोमवारपासून उपनगरीय सेवेत दाखल होईल. पहिली एसी लोकल सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल.

Air Conditioned Local will start from Mumbai | "प्रतीक्षा संपली! वातानुकूलित लोकल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार

"प्रतीक्षा संपली! वातानुकूलित लोकल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार

Next

मुंबई : बहुप्रतीक्षित वातानुकूलित लोकल सोमवारपासून उपनगरीय सेवेत दाखल होईल. पहिली एसी लोकल सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल. बोरीवली ते चर्चगेट या मार्गावर ती धावेल. या मार्गावरील पहिल्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी १६५ रुपये मोजावे लागतील. चर्चगेट ते विरार मासिक पास २०४० रुपये आहे.
एसी लोकल सेवेत दाखल कधी होणार, याची माहिती शुक्रवार रात्रीपर्यंत अधिकाºयांना नव्हती. खासगीत ती नाताळच्या मुहूर्तावर धावेल, असे अधिकारी सांगत होते. अधिकृत घोषणा शनिवारी झाली. एसी लोकलचे दर हे प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. सुरुवातीचे सहा महिने प्रदर्शनीय सूट म्हणून भाडे १.२ पट आकारण्यात येईल. नंतर ते १.३ पट होईल. आठवड्यातील पाच दिवस ही लोकल धावेल. वेग ताशी ९०-१०० किमी असेल. प्रवासी सुविधेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान डब्यात असतील. शनिवार, रविवार देखभालीसाठी ती कारशेडमध्ये उभी राहणार असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सफरीचा आनंद घेता येणार नाही.

प्रवास तिकीटदर (अंदाजित)

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.

चर्चगेट ते दादर ९० रु.

चर्चगेट ते वांद्रे ९० रु.

चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.

चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.

चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.

चर्चगेट ते वसई २१० रु.

चर्चगेट ते विरार २२० रु.

गाडीचा वेग : ११० किमी प्रतितास

प्रवासी क्षमता : ५,९६४ आसने : १,०२८

असे आहे वेळापत्रक

एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल. बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.

बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)

चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)

विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)

चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)

विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)

चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)

विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)

चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)

बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)

चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)

विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)


एसी लोकल पाहण्याची संधी

पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत. 

Web Title: Air Conditioned Local will start from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.