Join us

मेट्रोच्या धर्तीवर वातानुकूलित लोकलचे दरवाजे होणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:22 AM

मुंबई : वातानुकूलित लोकल प्रवाशांची दरवाजाच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे. या लोकलमधील दरवाजा उघड-बंद करण्याचा वेळ वाढवण्यासाठी पश्चिम ...

मुंबई : वातानुकूलित लोकल प्रवाशांची दरवाजाच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे. या लोकलमधील दरवाजा उघड-बंद करण्याचा वेळ वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे भविष्यातयेणाऱ्या एसी लोकलमधील दरवाजांची उघड-बंद प्रक्रिया मेट्रोप्रमाणे वेगवान होईल.पश्चिम रेल्वेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त चर्चगेट येथे रेल्वेच्या विविध चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. महाव्यवस्थापक गुप्ता यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. देशातील पहिली वातानुकूलितलोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहे.स्थानकात ती पोहोचल्यानंतर दरवाजा उघडणे ते प्रवाशांनी बोगीत प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद होणे यासाठी सद्य:स्थितीत १ मिनिटाचा वेळ जातो. यामुळे एसी लोकलला अधिक थांबा दिल्यास त्याचा परिणाम अन्य लोकल फे-यांवर होतो. वातानुकूलित मेट्रोमध्येमात्र दरवाजा उघड-बंद प्रक्रिया अवघ्या ३० सेकंदांत पूर्ण होते. यामुळे मेट्रोच्या धर्तीवर एसी लोकल दरवाजा उघड-बंद करणा-या यंत्रणेचा वेग वाढवावा, अशा सूचना महाव्यवस्थापक गुप्ता यांनी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) केल्या आहेत.आयसीएफमध्ये एसी लोकल बांधणीचे काम जोरात सुरू आहे. जानेवारी २०१९ अखेर नवीन वातानुकूलित लोकल दाखल होणारआहे. प्रोटोटाइप लोकलमध्ये येणा-या अडचणी आणि समस्या जाणून घेत योग्य ते बदल नवीन वातानुकूलित लोकलमध्ये करण्यात येणारअसल्याचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी सांगितले.सेल्फी पॉइंट आणि बरेच काहीचर्चगेट येथे भरवण्यात आलेल्याप्रदर्शनात पहिल्या लोकलपासूनएसी लोकलसह बुलेट ट्रेनचे विविधमॉडेल साकारण्यात आले आहेत.प्रवाशांसाठी हेरिटेज इंजीनसह सेल्फीघेण्यासाठी विशेष सेल्फी पॉइंटहीप्रदर्शनाच्या स्थळी उभारण्यात आलेआहेत. प्रदर्शन ७ नोव्हेंबरपर्यंतसकाळी १० ते सायंकाळी ६वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पाहतायेणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठीविनामूल्य असल्याने रेल्वेप्रेमींसहअन्य नागरिकांनी या प्रदर्शनाला भेटद्या, असे आवाहन पश्चिम रेल्वेचेमुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्रभाकर यांनी केले.

टॅग्स :एसी लोकलपश्चिम रेल्वे