मुंबई: आपला जीव धोक्यात घालून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सैन्यानं अनोखी मानवंदना दिली. भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० विमानांनी मरीन ड्राईव्हवर पुष्पवृष्टी करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यानंतर के. ई. एम आणि कस्तुरबा रुग्णालयांवरदेखील पुष्पवर्षाव करण्यात आला. दिल्लीतल्या पोलीस मेमोरियलमध्ये श्रद्धांजली अर्पण करून हवाई दलानं फ्लायपास्टला केली. हवाई दलाच्या पहिला फ्लायपास्टला श्रीनगरमधून सुरुवात झाली. दिल्ली, मुंबई, चेन्नई, गोवा, जयपूरमधील रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करत हवाई दलानं कोरोनाविरोधात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगारांचे आभार मानले. हवाई दलाच्या सुखोई-३०, मिग-२९, जग्वार या लढाऊ विमानांनी यामध्ये सहभागी घेतला. याशिवाय सी-१३० वाहतूक विमानाचाही फ्लायपास्टमध्ये सहभाग होता. नागपुरमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हवाई दलानं मानवंदना दिली. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी बँडचं सादरीकरणंही केलं. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी हवाई दलानं सलाम केला.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बोलाविली बैठकराहुल गांधींना प्रत्युत्तर देणारं 'ते' ट्विट भाजपाकडून अवघ्या काही मिनिटांत डिलीटकाश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार