वायू सेनेच्या वाहनाचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले २४ जणांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:29+5:302021-03-17T04:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपर पूल उतरत असताना वायू सेनेच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसचे स्टेअरिंग लॉक झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर पूल उतरत असताना वायू सेनेच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसचे स्टेअरिंग लॉक झाले. काही करण्यापूर्वीच बस दुभाजकावर धडकली. मात्र, चालकाने वेळीच परिस्थिती हाताळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी बसमध्ये २४ जण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वायू सेनेचे कर्मचारी आणि कुटुंब कुलाबा येथून कोलशेतला जात असताना, घाटकोपर परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात वायू सेनेचे ४ अधिकारी जखमी झाले. बसमधील सर्वांना उपचारासाठी ठाणे येथील वायू सेनेच्या रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या दुर्घटनेत काेणीही गंभीर जखमी झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
..........................