अंतर्वस्त्रात लपवले एक कोटीचे सोने; एअर होस्टेसला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:14 PM2019-10-20T13:14:26+5:302019-10-20T14:25:24+5:30

दुबईहून एक खासगी विमान शनिवारी मुंबई विमानतळावर पोहोचले होते.

Air Hostess With Gold Dust In In Undergarments In Her Bag Held At Mumbai Airport | अंतर्वस्त्रात लपवले एक कोटीचे सोने; एअर होस्टेसला अटक!

अंतर्वस्त्रात लपवले एक कोटीचे सोने; एअर होस्टेसला अटक!

Next

मुंबई : मुंबई विमानतळावर एका एअर होस्टेसला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी एअर होस्टेस दुबईहून मुंबईला आली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. एअर होस्टेसच्या बॅगेतून जवळपास 4 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर होस्टेसने सोने बॅगमध्ये अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. 

दुबईहून एक खासगी विमान शनिवारी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. या विमानातून एअर होस्टेस अवैधरित्या सोने आणलेली बॅग लपविण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी संशय आल्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊ चौकशी केली असता बॅगमधील अंतर्वस्त्रामध्ये सोने आढळून आल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

60 हजार रुपये देण्याचे आश्वासन
अधिकाऱ्यांनी ज्यावेळी एअर होस्टेसची चौकशी केली. त्यावेळी एअर होस्टेच्या बॅगमध्ये सोने सापडल्यानंतर तिला अधिकाऱ्यांनी अटक केली. यावेळी तिने सांगितले की, एक व्यक्तीने सोने आणण्यासाठी 60 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

30 किलो सोने जप्त
दुसरीकडे, मुंबई विमानतळाच्या कार्गो टर्मिनहून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जवळपास 30 किलो सोने आणि 60 किलो चांदी जप्त केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोने आणि चांदी विमानतळावरील एका कंपनीच्या कार्यालयामधून जप्त करण्यात आली आहे. सोने तस्करीसंबंधी कंपनीची चौकशी करण्यात येत आहे. 
 

Web Title: Air Hostess With Gold Dust In In Undergarments In Her Bag Held At Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.