एअर इंडियाच्या विमानाचं हायड्रोलिक निकामी, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:09 PM2018-06-20T23:09:55+5:302018-06-20T23:11:33+5:30
एअर इंडियाच्या AI985 या अहमदाबाद- मुंबई विमानाचं हायड्रोलिक निकामी झाल्यानं त्याचं तात्काळ रात्री 8.15 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे.
मुंबई- एअर इंडियाच्या AI985 या अहमदाबाद- मुंबई विमानाचं हायड्रोलिक निकामी झाल्यानं त्याचं तात्काळ रात्री 8.15 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडिया विमान AI985नं बुधवारी अहमदाबादहून संध्याकाळी 7.30 वाजता 131 प्रवाशांसह उड्डाण केलं.
उड्डाणादरम्यान वैमानिकाच्या हायड्रोलिक निकामी झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वैमानिकानं एअर इंडियाशी संपर्क साधला आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची सूचना दिली. त्याच वेळी एअर इंडियाच्या अहमदाबाद- मुंबई AI985 या विमानाचं रात्री 8.36 वाजता मिनिटांनी सुरक्षितरीत्या लँडिंग केलं. जेव्हा एअर इंडिया प्रशासनाला याची माहिती मिळाली, त्यावेळी एकच खळबळ उडाली. एअर इंडिया प्रशासनानं इमर्जन्सी लँडिंगपूर्वी रन-वेवर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि अँब्युलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. परंतु वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत रात्री 8.36 वाजता सुरक्षित लँडिंग केलं.
Ahmedabad-Mumbai Air India flight AI 985 landed safely at 2036 hours. Full emergency was declared for the flight at 2015 hours due to hydraulic failure. https://t.co/1ejJAEQ3Kh
— ANI (@ANI) June 20, 2018