एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

By मनोज गडनीस | Published: May 8, 2024 07:40 PM2024-05-08T19:40:46+5:302024-05-08T19:43:32+5:30

बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत.

Air India cancels 90 flights suddenly More than 300 employees 'suddenly' sick, passengers suffer | एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

मुंबई- एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आजारपणाचे कारण देत सामुहिक रजा घेतल्याचा फटका कंपनीच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवेला बसला असून बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका मुंबईसह देशातील विविध विमानतळांवरून कंपनीच्या विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) याची घटनेची गंभीर दखल घेतली असून कंपनीकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे. प्राप्त माहितीनुसार, टाटा समुहातर्फ चालविल्या जाणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. याला विरोध करत या कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण देत रजा घेत हे आंदोलन केले आहे.

Web Title: Air India cancels 90 flights suddenly More than 300 employees 'suddenly' sick, passengers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.