Join us

एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

By मनोज गडनीस | Published: May 08, 2024 7:40 PM

बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत.

मुंबई- एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आजारपणाचे कारण देत सामुहिक रजा घेतल्याचा फटका कंपनीच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवेला बसला असून बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका मुंबईसह देशातील विविध विमानतळांवरून कंपनीच्या विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) याची घटनेची गंभीर दखल घेतली असून कंपनीकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे. प्राप्त माहितीनुसार, टाटा समुहातर्फ चालविल्या जाणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. याला विरोध करत या कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण देत रजा घेत हे आंदोलन केले आहे.

टॅग्स :मुंबईएअर इंडिया