मुंबई : एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी छत्रपती शिवाजी विमानतळाच्या एका एरोब्रिजला धडकले. मात्र मोठी दुर्घटना टळली. हे विमान रियाधहून मुंबईला आले होते. उड्डाणानंतर झालेल्या या अपघातात विमानाच्या डाव्या पात्याच्या रोटर ब्लेड्सला नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एअर इंडियाच्या अक922 या विमानाचे पार्किंग करत असताना एरोब्रिजला धडक बसली. ‘अरायव्हल बे’च्या येथे विमानाच्या उजव्या बाजूचे इंजीन एरोब्रिजला धडकले. यामुळे विमानाच्या इंजिनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. विमान पार्किंग करत असताना फ्लाइट गायडन्सच्या चुकीच्या माहितीने हा अपघात झाला.विमानाला पार्किंगला नेत असताना रोटर ब्लेड्स एरोब्रिजला धडकले. विमानातील प्रवासी सुखरूप असून या घटनेचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एअर इंडियाचे विमान एरोब्रिजला धडकले!
By admin | Published: July 02, 2016 2:31 AM