Join us

एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका

By मनोज गडनीस | Published: January 24, 2024 6:02 PM

विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

मुंबई - निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांच्या पालनांची पूर्तता न केल्याप्रकरणी एअर इंडिया कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १ कोटी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी यापूर्वी एअर इंडियाला डीजीसीएने कारणे दाखवा नोटिस देखील जारी केली होती. 

प्राप्त माहितीनुसार, याच विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. विशेषतः लांब पल्ल्याच्या विमान सेवेत कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची डीजीसीएने सखोल पडताळणी केली होती. यामध्ये कंपनीने सुरक्षा नियमांची पूर्तता न केल्याचे डीजीसीएला आढळून आले होते. यानंतर कंपनीला कारणे दाखवा नोटिस जारी केली होती. मात्र, त्या उत्तराने समाधान न झाल्याने कंपनीवर ही दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :एअर इंडिया