Join us

एअर इंडियाला ठोठावला ८० लाख रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:01 AM

वैमानिकांचे वेळापत्रक, कर्मचाऱ्यांच्या तणावाचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने डीजीसीएने जानेवारी महिन्यात एअर इंडिया कंपनीचे स्पॉट ऑडिट केले होते.

मुंबई : वैमानिकांच्या वेळापत्रकासंदर्भात निर्धारित निकषांचे पालन न करणे, कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती न दिल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

वैमानिकांचे वेळापत्रक, कर्मचाऱ्यांच्या तणावाचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने डीजीसीएने जानेवारी महिन्यात एअर इंडिया कंपनीचे स्पॉट ऑडिट केले होते. त्यादरम्यान वैमानिक, केबिन कर्मचाऱ्यांना आठवड्याला आवश्यक अशी पुरेशी विश्रांती न देणे, लांबपल्ल्याच्या विमान प्रवासाअगोदर व नंतर कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न देणे यासंदर्भात निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.  

याची दखल घेत डीजीसीएने १ मार्च रोजी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली होती. कंपनीने दिलेले उत्तर समाधानकारक न वाटल्यामुळे डीजीसीएने ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :एअर इंडिया