Join us

एअर इंडियाच्या विमानाचे पॅरिस उड्डाण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:50 AM

पॅरिसमध्ये शिक्षण व नोकऱ्यांसाठी जात असलेल्या तरुणांना व्हिसाची समस्या उद्भवण्याची भीती असल्याने शिक्षण व नोकºया धोक्यात आल्या आहेत.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १११७ या विमानाचे उड्डाण सोमवारी रद्द झाले. पॅरिसमध्ये शिक्षण व नोकऱ्यांसाठी जात असलेल्या तरुणांना व्हिसाची समस्या उद्भवण्याची भीती असल्याने शिक्षण व नोकºया धोक्यात आल्या आहेत.एअर इंडियाचे हे विमान ‘वंदे भारत’अंतर्गत २३ जूनला दुपारी २.३० वाजता उड्डाण करणार होते. पॅरिसमध्ये बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेले सुमारे ७० विद्यार्थी त्यातून जाणार होते. त्यासाठी देशाच्या विविध भागांतून प्रवासी मुंबईत आले होते. प्रवाश्यांना बोर्डिंग पास देण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अचानक साडेबारा वाजता विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हवालदिल झालेल्या प्रवाशांनी गदारोळ केल्यावर त्यांना रिफंड देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.पण, एअर इंडिया कर्मचाºयांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती नाशिकहून आलेल्या श्रुती चांद या विद्यार्थिनीने दिली. सुरुवातीला रिफंड देण्यास मनाई करण्यात आली व नंतर रिफंड देण्यास होकार देण्यात आला. या प्रवाशांच्या झालेल्या मानसिक व आर्थिक नुकसानीला जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी श्रुतीचे वडील राजेश चंद यांनी केली.विद्यार्थ्यांना घरी परतण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. साठ हजार रुपयांचे तिकीट काढून असे हाल होणार असतील तर काय म्हणावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर एअर इंडियाला परवानगी मिळाली नव्हती तर परवानगीशिवाय तिकीट आरक्षण का केले, असा प्रश्न श्रुतीने उपस्थित केला. या ७० विद्यार्थ्यांशिवाय वर्क व्हिसा असलेले व काही फ्रेंच नागरिक या विमानातून प्रवास करणार होते.उड्डाण रद्द करण्याचा संदेश दुपारी १२.३०ला आल्यानंतर चेक इन प्रक्रिया रद्द करण्यात आली. एअर इंडियाच्या कॉल सेंटर व मिस कम्युनिकेशनमुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही व विमानतळावरून बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील उड्डाण कधी होणार याची माहितीही कर्मचाºयांना नव्हती. अखेर आम्हाला भांडून रिफंडबाबत लेखी पावती मिळवावी लागल्याचे श्रुतीने स्पष्ट केले. वंदे भारतच्या नावाखाली एअर इंडिया अतिरिक्त तिकीट दर आकारत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला.>परवानगी न मिळाल्याने उड्डाण रद्दया सर्व गदारोळानंतर प्रवासी अखेर साडेचार वाजता विमानतळाबाहेर निघाले. देशाच्या दुसºया भागातून आलेल्यांना रूम घेऊन राहावे लागले व विनाकारण परतीच्या प्रवासाचा आर्थिक भुर्दंड पडला. याबाबत एअर इंडिया प्रशासनाने सांगितले की, फ्रान्समध्ये प्रवेश देण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी दोन्ही सरकारमध्ये चर्चा सुरू असून परवानगी मिळालेली नसल्याने हे उड्डाण रद्द केले.

टॅग्स :एअर इंडिया