Join us  

एअर इंडियाने केली ९ हजार कर्मचाऱ्यांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 7:52 AM

कंपनीचे मुख्याधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे ही माहिती पुढे आली आहे. 

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून भारतीय हवाई क्षेत्राचा जोमाने विस्तार झाला असून, एअर इंडिया कंपनीने गेल्या दोन वर्षांत नऊ हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यामध्ये वैमानिक आणि केबिन कर्मचारी यांची संख्या पाच हजार इतकी आहे. कंपनीचे मुख्याधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे ही माहिती पुढे आली आहे. 

टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यापासून कंपनीने मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू केला आहे. तसेच विमान सेवेचा देखील कायाकल्प सुरू केला आहे. कंपनीने नव्या विमानांची खरेदीदेखील केली आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या १४२ विमाने असून, कंपनीने गेल्या दोन वर्षांत ३५ नव्या मार्गांवर सेवा सुरू केली आहे. यामध्ये २५ आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत तर १० देशांतर्गत मार्ग आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासल्यामुळे कंपनीने ही भरती केली आहे. या नव्या भरतीनंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ५४ वरून ३५ इतके झाले आहे. 

टॅग्स :एअर इंडियामुंबई