एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

By मनोज गडनीस | Published: January 9, 2024 06:40 PM2024-01-09T18:40:20+5:302024-01-09T18:41:09+5:30

चॅटबॉटच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन आदी भाषांतून प्रवाशांना सेवा मिळू शकेल.

Air India passengers now assisted by AI Chatbot to answer 1300 questions | एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

मुंबई - दैनंदिन आयुष्य सुकर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला असून आता एअर इंडियाने विमान प्रवासाशी निगडीत शंका निरसनासाठी या तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय जारी केला आहे. या करिता एअर इंडिया कंपनीने वॉट्स अपच्या माध्यमातून एक चॅट बॉट तयार केला असून याद्वारे प्रवाशांना त्यांच्या बोर्डिंग पास डाऊनलोड करणे, ई-तिकीटाची प्रत मिळवणे, प्रवासाची माहिती, सामानाची माहिती, सीट निवडण्याची सुविधा तसेच आवश्यक त्या अन्य सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. आजवर प्रवाशांना येणाऱ्या समस्यांचे वेध घेत व त्याचे वर्गीकरण करत कंपनीने १३०० प्रश्नोत्तरे तयार केली असून त्याची उत्तर प्रवाशांना तातडीने मिळू शकतील. या चॅटबॉटच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन आदी भाषांतून प्रवाशांना सेवा मिळू शकेल.

Web Title: Air India passengers now assisted by AI Chatbot to answer 1300 questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.