मुंबई : एअर इंडियाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानांची आरक्षण प्रक्रिया 30 एप्रिल पर्यंत पुढे ढकलली आहे. कोरोनामुळे देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेले असले तरी एअर इंडिया ने आरक्षण प्रकिया 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्याने लॉकडाऊन वाढेल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. 14 एप्रिल पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतूक रद्द करण्यात आली आहे. मात्र असे असताना एअर इंडिया ने 30 एप्रिल पर्यंत आरक्षण प्रक्रिया रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, एअर इंडियाच्या वेैमानिकांच्या संघटनेने त्यांच्या भत्त्यामधील 10 टक्के कपातीला विरोध दर्शवला आहे.