जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:53 AM2019-04-20T05:53:22+5:302019-04-20T05:53:57+5:30
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली सर्व उड्डाणे रद्द केल्यानंतर आता आर्थिक संकटाचे काळे ढग राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाकडे झेपावू लागले आहेत.
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली सर्व उड्डाणे रद्द केल्यानंतर आता आर्थिक संकटाचे काळे ढग राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाकडे झेपावू लागले आहेत.
एअर इंडियावर एकूण २९,००० कोटी कर्ज आहे व त्यापैकी ९००० कोटी कर्जाची परतफेड कंपनीला मार्च २०२० पूर्वी करायची आहे; परंतु एअर इंडियाजवळ सध्या एवढी मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता नाही. त्यामुळेच कंपनीने मदतीसाठी वित्त मंत्रालयाला साकडे घातले आहे. गळेकापू स्पर्धेमुळे व अनावश्यक नोकर भरती झाल्यामुळे एअर इंडियाला सतत तोटा होत आहे. याचबरोबर बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना पाकिस्तानवरून उडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळून जाण्यासाठी लांबचा फेरा पडतो आहे. या एकाच कारणामुळे एअर इंडियाला दररोज सहा कोटी तोटा होतो आहे.