Join us

एअर इंडियाच्या ताफ्यात दुसरे आलीशान ए-३५० दाखल

By मनोज गडनीस | Published: February 06, 2024 5:22 PM

डिसेंबर महिन्यात एअर इंडियाच्या ताफ्यात पहिले ए-३५० विमान दाखल झाले होते.

मनोज गडनीस, मुंबई : भारतीय प्रवाशांना आलीशान व आरामदायी प्रवासाची अनुभुती देणारे एअरबस कंपनीचे ए-३५० जातीचे दुसरे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात नुकतेच दाखल झाले आहे. फ्रान्स येथून हे विमान दिल्लीत दाखल झाले आहे. येत्या १९ फेब्रुवारी पासून एअर इंडिया कंपनीतर्फे देशांतर्गत मार्गासाठी हे विमान उड्डाण करणार आहे. यापूर्वी, डिसेंबर महिन्यात एअर इंडियाच्या ताफ्यात पहिले ए-३५० विमान दाखल झाले होते. हे विमान आता देशातील विविध मार्गांसाठी उड्डाण करत आहे.

भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात सध्या असलेल्या विमानांच्या तुलनेत हे विमान अत्यंत आलीशान असून यामध्ये एकूण ३१६ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. हे विमान तीन श्रेणींमध्ये विभागले असून यापैकी २८ जागा या बिझनेस क्लाससाठी राखीव आहेत. तर, २४ जागा या प्रीमीयम इकोनॉमी श्रेणीमधील आहेत. उर्वरित जागा या सामान्य इकोनॉमी प्रवासासाठी उपलब्ध आहेत. या विमानातील सर्व सीटच्या मागे मनोरंजनासाठी अद्ययावत स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबईएअर इंडिया