Join us

वाईट, अतिशय वाईट असणारी मुंबईची हवा समाधानकारक झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 6:05 PM

कोरोनाला हरविण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आले  असून, या लॉकडाऊनमुळे मुंबईमधील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण घटल्याचा दावा केला जात आहे.

 

 

  • जागतिक पर्यावरण दिन : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला
  • हवेतील धुळीकणांचे प्रमाण १५० पार्टीक्युलेट मॅटर हून थेट ५० वर
  • माझगाव, बीकेसी, अंधेरी, चेंबूरमध्ये हवेचा दर्जा समाधानकारक 

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आले  असून, या लॉकडाऊनमुळे मुंबईमधील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण घटल्याचा दावा केला जात आहे. विशेषत: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मुंबई महापालिकेनेही वायु वैविध सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत तयार केलेला वायूप्रदूषण पातळीबाबतचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषित ठिकाणांची हवादेखील समाधानकारक नोंदविण्यात आली आहे.मुंबई महापालिकेने जानेवारी ते मे या महिन्यादरम्यानच्या हवेची गुणवत्तेची पातळी मोजली आहे. चेंबूर, भांडुप, बाकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरीवली येथील हवेची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या सर्व ठिकाणी हवेत तंरगणा-या धुळीकणांचे प्रमाण १५० पार्टीक्युलेट मॅटरच्या आसपास होते. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हवेतील धूळीकणांचे प्रमाण मे महिन्यात थेट ५० पार्टीक्युलेट मॅटर एवढे खाली घसरले. याचाच अर्थ मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला होता.जानेवारी महिन्यात मुंबईच्या बहुतांशी भागात हवेचा दर्जा वाईट, अतिशय वाईट आणि मध्यम नोंदविण्यात आला होता. फेब्रूवारी महिन्यातदेखील सरासरी प्रमाण हेच राहिले. मार्च महिना देखील हवेच्या गुणवत्तेच्या दर्जाबाबत निराशाजनकच राहिला. एप्रिलमध्ये मात्र हवेचा दर्जा सुधारु लागला. बहुतांशी ठिकाणी म्हणजे भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, माझगाव येथे हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला. मे महिन्यात देखील याच ठिकाणी हवेचा दर्जा मध्यम, समाधानकारक  राहिला...............................मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायु वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईच्या हद्दीत स्थिर वायु सर्वेक्षण केंद्रामार्फत विविध ठिकाणी वायु सर्वेक्षणाचे काम केले जाते. क्षेपणभूमी आणि वाहतूक नाक्यावरील वायु प्रदुषणाचे मोजमाप स्वयंचलित वाहनामार्फत केले जाते. नागरिकांच्या प्रदुषण विषयक तक्रारीनुसार विशेष सर्वेक्षण करून तक्रारीचे निवारण करण्यात येते. १९७६ सालापासून सुरु असलेल्या प्रयोगशाळेत वायु सर्वेक्षणाचे काम केले जाते...............................बांधकाम क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे बंद असल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. मागील दहा वर्षाचा विचार करता वातावरण प्रदूषण वाढीस मोठया प्रमाणावर जबाबदार असलेले बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवले तर प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल...............................

  • स्थिर वायु सर्वेक्षण केंद्रे - ३
  • फिरते प्रदूषण मापन वाहन सर्वेक्षण केंद्रे - ४
  • सफर प्रकल्प सर्वेक्षण केंद्रे - ९

..............................

टॅग्स :पर्यावरणमुंबईमहाराष्ट्र