अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या पाशर््ववभूमीवर देशात संचारबंदी असल्याने वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. याचा चांगला परिणाम वातावरणात दिसून आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात इतर सर्व प्रकारची रहदारी जवळपास थांबली आहेत, तसेच इतर प्रदुषण करणारी कामही थांबली आहेत. त्यामुळेच ठाणे शहरातील मागील काही दिवसांत हवेतील प्रदूषणात तब्बल ४० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरात आता प्रदूषण हे चवथ्या स्तरातून तिसऱ्यावर आले असून येत्या काही दिवसात ते दुसºया स्थानावर येणार आहे. ठाणे महापालिकाक्षेत्रात आजघडीला एकूण १९ लाख २७ हजार १५५ वाहने आहेत. शहरातील विविध भागात मागील काही दिवसांत प्रदूषणात कमालीची घट झाल्याचे आढळून आले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने ३१ मार्चला केलेल्या पडताळणीत सर्वात कमी प्रदूषण हे तीन हात नाका परिसरात आढळून आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या परिसरात ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळ असते. आशियातील सर्वाधिक वाहनांची येजा असणारा परिसर म्हणून याची नोंद आहे. त्यामुळे नेहमीच या ठिकाणची प्रदुषणाची पातळी ही अतिप्रदुषित असल्याचे दिसून येत होते. परंतु सध्या या ठिकाणी वाहनांची ये जा बंद झाल्याने येथील हवेतील प्रदुषणात घट झाली आहे. त्यानुसार येथील हवा प्रदुषण ५२ टक्यांवर आले आहे. पूर्वी येथील हवा प्रदुषण हे ९५ ते १०० टक्यापर्यंत होते. आता त्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे शहरातील महत्वाच्या १६ चौकातील प्रदूषणाची मोजणी ही या अंतर्गतच केली गेली आहे. त्यानुसार या प्रुमख चौकातील प्रदुषणाची पातळी देखील सुधारली असून आत देखील ५२ टक्यांपर्यंत आली आहे. तर निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय, येथे ५७ टक्के हवा प्रदूषित आढळली असल्याची नोंद झाली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा सर्वाधिक ६२ टक्के हवा प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे.औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनी अंतर्गत वागळे इस्टेट शास्त्री नगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणात मागील काही दिवसांत कमालीची घट झाली असून येथेही ५७ टक्के हवा प्रदूषित आढळली आहे.महापालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत केलेल्या या सर्वेक्षणात नायट्रोजन आॅक्साइड व धुलीकणांचे प्रमाण हे कमी झाल्याचे आढळून आले आहे. ठाणे कळवा जोडपुलाजवळील बाळकुम, साकेत, शिवाजी चौक आणि सिडको रोड आदी ठिकाणी देखील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था जवळपास थांबली आहे. तसेच फेरीवाले लोंकांची वर्दळ यातही घट झाल्याने हा फरक पडला आहे. प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तपासण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा पिवळा नारंगी आणि लाल या रंगाचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अति शुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध, नारंगी रंगात प्रदूषित, तर लाल रंग असलेला परिसर अति प्रदूषित गटात मोडतो. सध्या ठाणे शहर परिसर हा नारंगी रंगाच्या गटात मोडत असून तो पिवळ्या गटापर्यंत आला आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे.
ठाण्यातील हवेतील प्रदुषण ४० टक्यांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:30 PM