Join us

एअर इंडियाचा १३ गोलांचा धडाका

By admin | Published: February 14, 2017 3:33 AM

आशिष लालघे आणि अद्वैत शिंदे यांच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर १९ वर्षांखालील एअर इंडियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात

मुंबई : आशिष लालघे आणि अद्वैत शिंदे यांच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर १९ वर्षांखालील एअर इंडियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात तब्बल १३ गोलांचा पाऊस पाडला. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना (एमडीएफए) सुपर डीव्हीजन गटात एअर इंडियाने वेस्ट झोन युनायटेडचा १३-३ असा फडशा पाडला. अंधेरी क्रीडा संकुलात झालेल्या या एकतर्फी सामन्यात बलाढ्य एअर इंडियाच्या आक्रमक खेळापुढे वेस्ट झोनचा काहीच निभाव नाही लागला. त्यांनी ३ गोल नोंदवले खरे, परंतु एअर इंडियाला दबावाखाली आणण्यात त्यांना यश आले नाही. साहेब अहुजा (२८ मिनिट), मुबीन मुकादम (६८ व ७४) यांनी वेस्ट झिन युनायटेडकडून अपयशी झुंज दिली.आशिषने ५व्याच मिनिटाला एअर इंडियाला आघाडी मिळवून दिल्यानंतर त्याने ७५व्या, ७९व्या व ८१व्या मिनिटाला आणखी गोल करत निर्णायक कामगिरी केली. अद्वैतनेही (४२, ७३ व ७७) तीन गोल केले. तसेच, सुमेश नायर (१९ व ६२), डिंकू तोंबा (४४), हिमांशू राव (८४) आणि ओलीस रॉड्रिग्स (८८ व ९०) यांनीही संघाच्या शानदार विजयात मोलाचे योगदान दिले. (क्रीडा प्रतिनिधी)