विमानाची तिकिटे रद्द; एजंटकडून भरपाई
By admin | Published: February 20, 2015 12:59 AM2015-02-20T00:59:38+5:302015-02-20T00:59:38+5:30
अचानकपणे रद्द केल्याबद्दल ही तिकिटे ज्याच्याकडून काढली त्या एजन्टने प्रवाशास भरपाई द्यावी, असा आदेश दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
मुंबई : अमेरिकेत बोस्टन ते न्यूयॉर्क अशा प्रवासासाठी काढलेली विमानाची दोन ‘कन्फर्म्ड’ तिकिटे प्रवासाच्या दोन दिवस आधी अचानकपणे रद्द केल्याबद्दल ही तिकिटे ज्याच्याकडून काढली त्या एजन्टने प्रवाशास भरपाई द्यावी, असा आदेश दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
प्रवासाची तिकिटे ऐनवेळी रद्द करण्यास विमान कंपनी जबाबदार आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असे म्हणून एजंट जबाबदारी टाळू शकत नाही. एजंट हा तो ज्याच्यासाठी एजंट म्हणून काम करीत असतो त्या धन्याच्या (प्रिन्सिपल) भल्या-बुऱ्या कृत्यांसाठीही जबाबदार असतो, असे न्या. वीणा बिरबल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आयोगाच्या न्यायपीठाने नमूद केले.
दिल्लीतील एक नागरिक ओम प्रकाश पालिया यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर एए बी रिसॉर्ट्स अॅम्ड ट्रॅव्हल्स या एजन्टने त्यांना ६७, ५०० रुपये भरपाई द्यावी, असा आदेश आधी जिल्हा ग्राहक मंचाने दिला होता. त्याविरुद्ध एजंटने केलेले अपील फेटाळत राज्य आयोगाने जिल्हा मंचाचा आदेश कायम केला. पालिया यांनी प्रवासाच्या ७२ तास आधी तिकिटे पुन्हा ‘कन्फर्म’ करून घेणे गरजेजे होते. त्यांनी तसे केले नाही, म्हणून त्यांची तिकिटे रद्द केली गेली. असा एजंटचा दावा होता.