फ्रान्सची विमान तिकिटे पडली महागात, हॉटेल बुकिंगचे आमिष दाखवत १४ लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 10:20 AM2024-03-09T10:20:21+5:302024-03-09T10:21:23+5:30

एजंटने १४ लाख ९४ हजार उकळत फसवणूक केल्याचा प्रकार खार परिसरात घडला. 

air tickets to france became expensive 14 lakh fraud due to hotel booking | फ्रान्सची विमान तिकिटे पडली महागात, हॉटेल बुकिंगचे आमिष दाखवत १४ लाख उकळले

फ्रान्सची विमान तिकिटे पडली महागात, हॉटेल बुकिंगचे आमिष दाखवत १४ लाख उकळले

मुंबई : फ्रान्सला जाण्यासाठी स्वस्तात विमान तिकीट तसेच हॉटेल बुकिंग करण्याचे आमिष दाखवत एजंटने १४ लाख ९४ हजार उकळत फसवणूक केल्याचा प्रकार खार परिसरात घडला. 

विनय माखिजा (४३) यांच्या तक्रारीवरून फ्लाईंग फ्लिट्स या एजन्सीचा मालक मो. शादाब मो. खालिद फारुकी (३७) याच्या विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार विनय यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह परदेशी फिरायला जाण्याचे ठरवले. त्यांचा मित्र दिलावर सिंगच्यामार्फत त्यांची फारुखीसोबत ओळख झाली. आरोपीने ६ जणांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. या सर्वांकडून त्यांनी तिकिटाचे पैसे घेतले त्यानंतर तिकीट बुक करून त्या पैशांचा अपहार केला, असा आरोप त्याच्या विरोधात करण्यात आला आहे.

Web Title: air tickets to france became expensive 14 lakh fraud due to hotel booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.