Join us

विमान वाहतूक विस्कळीत, उड्डाणाला एक तास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:07 AM

वाहतूककोंडीचा फटका; प्रवाशांना विमानतळ वेळेत गाठणे अशक्य

मुंबई : मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील हवाई वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात बसला. वेगवान वारा, कमी दृश्यमानता व मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक बुधवारी एक तास विलंबाने होत होती.

रात्री साडेआठ वाजेपर्यंत विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांपैकी ५८ टक्के म्हणजे २५९ विमानांच्या उड्डाणांना एक तास व पाच मिनिटांचा विलंब झाला. १५ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. तर, मुंबईत उतरणाºया विमानांपैकी २३% म्हणजे १०४ विमानांना १५ मिनिटांचा विलंब झाला. दुपारी पावसाचा जोर जास्त असल्याने १० विमानांना गो अराऊंडचे निर्देश हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने दिले. उड्डाणे रद्द झालेल्या विमान कंपन्यांनी प्रवाशांना परतावा व दुसºया विमानाने प्रवास करण्याची मुभा दिली होती. ठिकठिकाणी पाणी भरल्याने मुंबईतील रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे अनेक प्रवाशांना वेळेत विमानतळ गाठणे शक्य झाले नाही. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने विमानतळावर काम करणाºया कर्मचाऱ्यांना व अधिकाºयांना घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य न झाल्याने विमानतळावर कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांना सलग काम करावे लागले.येथे साचले पाणीशहर : हिंदमाता, परळ टीटी,गांधी मार्केट, शक्कर पंचायत चौक, वडाळा, लक्ष्मी नारायण लेन,माटुंगा, वच्छराज लेन, माटुंगा (पू.), सायन कोळीवाडा, रावळी कॅम्प, पोस्ट आॅफिस, हिंदू कॉलनी, किडवाई नगर कॉलनी, रफी अहमद किडवाई मार्ग, वडाळा, सरदार हॉटेल, काळाचौकी, दादर प्लाझा समोर, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.) , रानडे रोड, दादर (प.)पूर्व उपनगरे : पोस्टल कॉलनी, चेंबूर, नेहरु नगर पूल, कुर्ला (पू.) , विद्याविहार रोड, कोहीनूर मॉल, कुर्ला (पू.), महाराष्ट्र नगर, मानखुर्द , फ्री वे, चेंबूर, पांजरपोल टनेल, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, एम. जी. रोड, घाटकोपर.पश्चिम उपनगरे : जवाहर नगर, खार (पू.), आदर्श नगर, एमएचबी कॉलनी, खेरनगर, वांद्रे बस डेपो, वांद्रे (प.) , लकी हॉटेल, वांद्रे (प.)

टॅग्स :मुंबईपाऊस