मुंबई क्षेत्रातील विमान वाहतुकीत तिप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:09 AM2019-03-01T01:09:30+5:302019-03-01T01:09:46+5:30

पाकिस्तान हवाई क्षेत्राचा वापर बंद : तीन हजार विमानांची वाहतूक

Air traffic in Mumbai sector tripled | मुंबई क्षेत्रातील विमान वाहतुकीत तिप्पट वाढ

मुंबई क्षेत्रातील विमान वाहतुकीत तिप्पट वाढ

- खलील गिरकर 


मुंबई : भारत-पाकिस्तानमधील हवाई कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याने मुंबईच्या हवाई हद्दीतून प्रवास करणाऱ्या व आंतरराष्ट्रीय मार्गावर जाणाऱ्या विमानांच्या संख्येत बुधवारी रात्री तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली होती. पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यावर बंधने लादण्यात आल्याने दिल्ली, जयपूर, अहमदाबाद यासह विविध ठिकाणांहून परदेशात जाणाºया विमानांची वाहतूक मुंबईच्या हवाई हद्दीमार्गे वळवण्यात आली होती. परिणामी बुधवारी रात्रभरात तब्बल ३ हजारपेक्षा अधिक विमानांनी मुंबईच्या हवाई हद्दीचा वापर केला. सामान्य परिस्थितीत होणाºया विमान वाहतुकीपेक्षा ही संख्या तिपटीने जास्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


पाकिस्तान हवाई हद्दीच्या वापरावरील बंदी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई हद्दीला वगळून जाण्यासाठी विमानांना मुंबईच्या हवाई हद्दीद्वारे प्रवास करावा लागत आहे. त्याचा फटका विविध देशांतील हवाई कंपन्यांना व त्याद्वारे प्रवास करणाºया प्रवाशांना बसला आहे. हवाई वाहतूक वाढल्याने मुंबईतील हवाई नियंत्रण अधिकाºयांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला.


एटीसी गिल्डचे विभागीय सचिव संतोष पटेल यांनी या माहितीला दुजोरा दिला. वाहतुकीत तिपटीने वाढ झाल्याच्या वेळी हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाºयांनी जबाबदारीने काम करून देशावरील संकटकाळी आपले कर्तव्य पार पाडले व त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. देशासाठी आम्हालाही काही करण्याची संधी मिळाली, अशी देशभक्तीची भावना अनेक अधिकाºयांमध्ये असल्याचे पटेल म्हणाले.

६६ अधिकाºयांनी केले हवाई वाहतूक नियंत्रण
मुंबईतील सुमारे ६६ हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाºयांनी या ३ हजार विमानांच्या वाहतुकीचे नियंत्रण केले. भारत व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत आम्हालाही देशभक्ती दाखवण्याची संधी मिळाली व आम्हालादेखील युद्ध लढत असल्याची भावना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अधिकाºयांनी व्यक्त केली.

Web Title: Air traffic in Mumbai sector tripled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.