दिवसभरात १५ लाख लसींची हवाईमार्गे वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:38+5:302021-05-31T04:06:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैद्यकीय साहित्याची जलद वाहतूक करून आरोग्य क्षेत्राला बळ देणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राने लस वहनातही ...

Air transport of 1.5 million vaccines in a day | दिवसभरात १५ लाख लसींची हवाईमार्गे वाहतूक

दिवसभरात १५ लाख लसींची हवाईमार्गे वाहतूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वैद्यकीय साहित्याची जलद वाहतूक करून आरोग्य क्षेत्राला बळ देणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राने लस वहनातही चांगली कामगिरी केली. शनिवारी दिवसभरात तब्बल १५ लाख लस मात्रांची हवाई मार्गाने वाहतूक करण्यात आली.

हवाई वाहतूकमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावर मात करण्यात आली. लसींच्या वाहतुकीतही आम्ही आघाडी घेतली असून, शनिवारी दिवसभरात देशभरातील १९ ठिकाणी १५ लाख लस मात्रा हवाईमार्गे पोहोचविण्यात आल्या. त्यासाठी १९ विमानांचा वापर करण्यात आला. त्याचे सरासरी वजन ७ हजार ६१९ किलो होते, असे त्यांनी सांगितले.

.................................

आतापर्यंत १ हजार २६२ विमानांद्वारे २० कोटी ४९ लाख लसींची वाहतूक करण्यात आली. देशातील ६० ठिकाणी पाठविलेल्या या लसींचे वजन ८४३ मेट्रिक टन होते.

Web Title: Air transport of 1.5 million vaccines in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.