ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - कॉकपीटमध्ये धूर येऊ लागल्यामुळे एअर इंडियाच्या मुंबई-भुवनेश्वर विमानाचे सोमवारी दुपारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एअर इंडिया कंपनीच्या मुंबईहून भुवनेश्वरला उड्डाण करणा-या विमानाच्या कॉकपीटमध्ये अचानक धूर येऊ लागल्यामुळे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. विमान भुवनेश्वरला जाण्यासाठी दोन वाजून 14 मिनिटांनी टेकऑफ झाले. मात्र, अवघ्या काही वेळात ही घटना घडली. या घटनेमुळे विमानाच्या पायलटने प्रसंगावधान दाखवत लगेचच विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग केले.
दरम्यान, विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. तसेच, या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना दुसऱ्या विमानाने भुवनेश्वरला रवाना करण्यात येणार असल्याचे समजते.
Full emergency declared for AI flight frm Mumbai-Bhubaneshwar due to suspected smoke in cockpit. Aircraft landed safely; emergency withdrawn pic.twitter.com/qJ84upSKkJ— ANI (@ANI_news) May 22, 2017