Join us

सोन्याच्या तस्करीत विमान कंपनीचा कर्मचारीही सहभागी, मुंबई विमानतळावर साडेसात किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:58 PM

Gold Smuggling: दुबईतून मुंबईत आलेल्या  पाच प्रवाशांद्वारे केलेल्या साडेसात किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या पाच जणांसोबत संबंधित विमान कंपनीचा एक कर्मचारीही गुंतला आहे.

मुंबई - दुबईतून मुंबईत आलेल्या  पाच प्रवाशांद्वारे केलेल्या साडेसात किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या पाच जणांसोबत संबंधित विमान कंपनीचा एक कर्मचारीही गुंतला आहे. त्यांच्या झडतीदरम्यान सोन्यासह त्यांच्याकडे चांदीची नाणी व ३ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम असा एकूण ४ कोटी ५१ लाख रुपयांचा ऐवज सापडला आहे.

दुबईतून येणाऱ्या पाच प्रवाशांच्या माध्यमातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला. या लोकांनी विमानातील आपल्या सीटखाली पावडर रूपात असलेल्या सोन्याची लहान पाकिटे लपवली होती. तर उर्वरित सोन्याची पावडर व चांदीची नाणी आपल्या बुटात लपवली होती. एका आघाडीच्या विमान कंपनीचा मुंबई विमानतळावरील कर्मचारीदेखील तस्करीत सहभागी होता. विमानातील सोने तो बाहेर घेऊन येणार होता.  ज्यावेळी अधिकाऱ्यांनी  या पाच प्रवाशांची झडती घेतली  तेव्हा त्यांच्याकडे सोने, चांदीची  नाणी व रोकड सापडली. संबंधित प्रवाशांच्या सीटखालून उर्वरित सोन्याच्या पावडरीचा साठा जप्त केला  आहे. 

५० हजार रुपयांसाठीसंबंधित सहाही जणांना अटक करण्यात आली आहे. या कामासाठी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला ५० हजार रुपये मिळणार होते. दरम्यान, या विमान कर्मचाऱ्याने यापूर्वी देखील अशा प्रकारे तस्करीसाठी मदत केल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :सोनंगुन्हेगारी