विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:30 AM2021-12-29T07:30:02+5:302021-12-29T07:30:29+5:30

Airlines : यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियाची एकूण थकबाकी २,३६२.३६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Airlines have defrauded the authority of Rs 2,362 crore | विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले

विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले

Next

मुंबई : देशातील प्रमुख सहा विमान कंपन्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे जवळपास सव्वीसशे कोटी रुपये थकविले आहेत. एअर इंडियाची थकबाकी सर्वाधिक आहे.

यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियाची एकूण थकबाकी २,३६२.३६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात ती २,१८३.७१ कोटी इतकी होती. खासगी कंपन्यांचा विचार करता, जानेवारीत इंडिगो, स्पाईस जेट, गो एअर, एअर एशिया आणि विस्ताराची थकबाकी १२२.८८ कोटी होती. नोव्हेंबरमध्ये ती २७३.९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, आमच्याकडील नोंदीनुसार ऑक्टोबर २०२१ पर्यंतची सर्व देयके चुकती झाल्याचे इंडिगो आणि विस्ताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एअर इंडियाची १०० टक्के मालकी टाटा समूहाकडे हस्तांतरित झाल्याने ही थकबाकी कोणी चुकती करावी, हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे 
एका अधिकाऱ्याने सांगितले. या विमान कंपनीच्या खासगीकरणासाठी इतका अर्थबोजा माथी घ्यावा लागला असताना आणखी 
भार उचलण्याची तयारी सरकारकडून दर्शविली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. ही थकबाकी नव्या मालकांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाने विविध सुविधा विकसित करण्यासाठी  प्राधिकरणाकडून जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्या जमिनीचे भाडे, पार्किंग शुल्क आणि देयके मिळून थकबाकीचा आकडा वाढला आहे.

वसुलीसाठी पर्याय...
थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दंडात्मक व्याज आकारणी, सिक्युरिटी डिपॉझिट रोखणे आणि कायदेशीर कारवाई करणे यासारखे इतर पर्याय भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहेत.
देशभरातील १२५ विमानतळे ‘एएआय’च्या अखत्यारीत येतात. या 
विमानतळांवर विमान प्रचलन करण्यासाठी कंपन्यांना विविध प्रकारचे शुल्क अदा करावे लागते. 

Web Title: Airlines have defrauded the authority of Rs 2,362 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान