Join us

मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर विमान कंपन्यांनी बंदी घालावी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:23 AM

प्रवासातील अनुभवानंतर न्यायाधीशांचे आदेश

नवी दिल्ली : मास्क न घातलेल्या प्रवाशांना विमानातून लगेच उतरवा आणि विमानाने उड्डाण घेतल्यानंतर जे प्रवासी मास्कशिवाय दिसतील, त्यांना कंपन्यांनी यापुढे विमान प्रवासावर बंदी घालावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. सी. हरीशंकर यांनी दिले आहेत.

मास्क घातल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सूचनाही दिल्या जाव्यात, असे न्यायालयाने विमान कंपन्यांना सांगितले आहे.न्या, हरीशंकर ५ मार्च रोजी विमानाने कोलकात्याहून दिल्लीला जात असताना अनेक प्रवाशांनी आपले मास्क काढले वा खाली घेतले असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत विमान कर्मचाऱ्यांना विचारले असता आपण असहाय्य आहोत, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले.प्रवासी उड्डाणापूर्वी प्रोटोकॉल पाळण्यास नकार देत असेल तर त्याला तत्काळ खाली उतरवले पाहिजे. एखादा प्रवासी नियम पाळण्यास नकार देत असेल तर त्याला नो-फ्लाय यादीत टाकण्यासह कारवाई करण्यात यावी, असे दिशानिर्देश जारी केले.

कंपन्यांचे अधिकारदिल्लीला पोहाेचल्यावर त्यांनी विमान प्रवासासंबंधीचे नियम पाहिले. त्यात नियम मोडणाऱ्या प्रवाशांना प्रवास बंदी घालण्याचा नियम असल्याचे त्यांना आढळले. प्रवासाचे नियम, संकेत मोडणाऱ्यांना  उतरवण्याचा वा भविष्यात प्रवासावर बंदी घालण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांना आहेत. त्याआधारे त्यांनी हे आदेश दिले. 

टॅग्स :न्यायालयविमानतळ