ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील भाग एक उन्नत मार्गासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:15 AM2022-12-17T10:15:13+5:302022-12-17T10:17:01+5:30

सदर प्रकल्प हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजली जवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल. तसेच सदर ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजीत ६५० मेट्रिक टन इतक आहे.

Airoli Katai Naka Road Project Part One Special Traffic Block for Elevated Road | ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील भाग एक उन्नत मार्गासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक

ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील भाग एक उन्नत मार्गासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक

googlenewsNext

मुंबई : ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या पहील्या भागतील उन्नत मार्गामधील मुंब्रा शिळफाटा दरम्यान, राज्यमहामार्ग क्रमांक ४ ओलांडण्यासाठी ६३ मीटर लांबीचे स्टीलचे ८  गर्डर उभारण्यात येणार आहेत. या गर्डरच्या उभारणीसाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून मर्यादीत वेळेत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

सदर प्रकल्प हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजली जवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल. तसेच सदर ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजीत ६५० मेट्रिक टन इतक आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाचे काम विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेले असून या प्रकल्पाची लांबी १२.३किमी इतकी आहे. तसेच हा प्रकल्प ३ भागांत प्रगतीपथावर आहे.

कामाचे स्वरूप -
पहिल्या ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान एकूण ४ गर्डर तर दुसऱ्या ब्लॉक मध्ये  उर्वरित ४ अशा प्रकारे एकूण ८ गर्डर उभारले जाणार आहेत. सदर कामामध्ये क्रेनच्या सहाय्याने २ गर्डर एकाचवेळी उचलले  जातील. या दोन गर्डरचे एकत्रित वजन सुमारे १६० ते १९० मेट्रिक टन इतके असेल. सदर गर्डर उभारणी साठी A-७५० टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन  वापरण्यात, तसेच डायाफ्राम जोडणीसाठी २ अतिरिक्त क्रेन वापरल्या जातील.

- गर्डर उभारणीसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात येणार २ ट्रॅफिक ब्लॉक 

- पहिला ब्लॉक  दि. १८ डिसेंबर २०२२ च्या रात्री ००:०१ वा. पासून २३:५९ वा. पर्यंत  असणार आहे

- दुसरा २५ डिसेंबर २०२२, ००:०१ वा. पासून २३:५९ वा. पर्यंत असणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महामार्ग क्र. ४ वर मुंब्रा शिळफाटा दरम्यान ची अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून ती इतर पर्यायी मार्गांनी वळविली जाईल. तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून इतर वाहतूक उड्डाणपूला खालून सुरू ठेवण्यात येईल.

ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील हा अवघड आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या गर्डर ची उभारणी पूर्णझाल्यावर प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण होईल. तसेच पारसिक बोगद्याचे काम सुध्दा प्रगतीपथावर असून त्याचे काम ६६% टक्के पूर्ण झालं आहे.
- एस. व्ही.आर. श्रीनिवास, एमएमआरडीए, महानगर आयुक्त

Web Title: Airoli Katai Naka Road Project Part One Special Traffic Block for Elevated Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.