विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:53 AM2019-04-04T01:53:21+5:302019-04-04T01:59:26+5:30

स्वीप उपक्रम : प्रत्येक जण मतदान करेल याची काळजी घेण्याचे उद्दिष्ट

From the airplane to the lift public awareness, must be voted | विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं

विमानापासून लिफ्टपर्यंत जनजागृती, मतदान करायलाच हवं

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार जसजसा शिगेला पोहोचत आहे; तसतसे निवडणुकीची रणधुमाळी वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे, राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच या साऱ्यात मतदानाचा टक्का घसरू नये, म्हणून निवडणूक आयोगाने उल्लेखनीय पावले उचलली आहेत. या अंतर्गत सीस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) ही महत्त्वाची प्रक्रिया असून, याद्वारे अधिकाधिक नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांसारख्या निवडणुकांदरम्यान रजा असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर शहरांबाहेर जातात, शिवाय अनेक नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतात. परिणामी, मतदानाचा टक्का घसरतो. या कारणात्सव मतदानाचा टक्का घसरण्याऐवजी मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून आयोगाने विविध स्तरावर उल्लेखनीय पावले उचलली आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सीस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन ही प्रक्रिया मोलाची भूमिका बजावणार आहे.

लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी स्वीप या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला मतदान करण्यासाठी प्रेरित करणे हे स्वीपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी बस, ट्रेन, विमान इत्यादी विविध माध्यमांतून प्रवास करणाऱ्या मतदाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी संबधित सरकारी यंत्रणा विविध सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था, अंगणवाडीसेविका, कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटीयर, शाळा-महाविद्यालये, महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी, खासगी संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. मतदान करण्यासाठीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी आरोग्यसेविका, चार हजार अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत पालक-शिक्षक समिती, महिला बचत गट, रोटरी-लायन्स क्लब यांची मदत घेतली जाणार आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये, सुमारे वीस हजार विविध सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मोकळ्या पॅसेजमध्ये, लिफ्ट जवळ मतदान करण्यासंदर्भातील आवाहन करणारे संदेश, भित्तिपत्रके लावली जाणार आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन थांबवता येणार

च्सिटिजन व्हिजिलन्स अंतर्गत सिव्हिजिल हे मोबाइल अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध आहे. निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेच उल्लंघन करणाºया अनुचित प्रकारांची तक्रार या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट आॅनलाइन करता येते. लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारांना प्रचार प्रसिद्धीसाठी लागणारी परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ९७६ मतदारांची जनजागृती करण्यात आली आहे.

Web Title: From the airplane to the lift public awareness, must be voted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.