Join us

नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा फटका मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 8:00 AM

मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमानांऐवजी केवळ १८ विमानेच उतरू शकतील

मुंबई : नवी मुंबईविमानतळावरविमान उतरविण्याची चाचणी करण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचा फटका आज, मंगळवारी मुंबईत उतरणाऱ्या विमानांना बसण्याची शक्यता आहे. तांत्रिक चाचणी सोमवारी सकाळी ११ ते ४ दरम्यान घेण्यात आली. आज, मंगळवारीही त्याच वेळेत पुन्हा चाचणी होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचणीला सुरुवात झाली आहे. साेमवारी धावपट्टी व सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. 

विमान उतरवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लँडिग सिस्टीम ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. ही चाचणी काही दिवसांपूर्वी होणार होती. मात्र मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे होऊ शकली नव्हती. परिणामी, मुंबईत उतरणाऱ्या विमानांना काही प्रमाणात विलंब होणार आहे. मात्र, मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांना याचा कोणताही फटका बसणार नाही.

सकाळी ११ ते ४ यावेळेत मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमाने उतरतात. मात्र, या चाचणीमुळे केवळ १८ विमानेच उतरू शकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :नवी मुंबईमुंबईविमानतळविमान