विमानतळ आज ६ तास बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:07 AM2023-10-17T10:07:24+5:302023-10-17T10:07:33+5:30
दरवर्षी मान्सूनच्या आधी व मान्सून संपल्यानंतर मुंबई विमानतळावरील रन-वेच्या देखभालीचे काम केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सून पश्चात विमानतळावरील सर्व व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मुंबई विमानतळावर मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळात विमानतळावरील दोनही रन-वे बंद राहणार आहेत.
त्यामुळे या कालावधीमध्ये मुंबईतून कोणतेही विमान उड्डाण घेणार नाही अथवा मुंबईत दाखल होणार नाही. या संदर्भात विमान कंपन्यांनाही सहा महिने अगोदर त्यानुसार विमान प्रवासाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
दरवर्षी मान्सूनच्या आधी व मान्सून संपल्यानंतर मुंबई विमानतळावरील रन-वेच्या देखभालीचे काम केले जाते. रन-वेवर आवश्यक ती डागडुजी केली जाते. तसेच अन्यही कामे केली जातात. मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. त्यामुळे तेथील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवल्याशिवाय देखभालीचे काम करता येत नाही.