Join us

विमानतळावरील कंत्राटी कामगारांना मिळणार वैद्यकीय विम्याचे कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:52 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या सुमारे ६ हजार कंत्राटी कामगारांना वैद्यकीय विम्याचे कवच मिळणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या सुमारे ६ हजार कंत्राटी कामगारांना वैद्यकीय विम्याचे कवच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष दोन लाख रुपये वैद्यकीय विमा मिळणार असून, या कालावधीत निधन झाल्यास पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना मिळतील.कर्मचाºयांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा निर्णय भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ युनिटच्या पाठपुराव्याने घेण्यात आला आहे. विमानतळाच्या विविध कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे पावणेसहा हजार कर्मचाºयांना या वैद्यकीय विम्याचा लाभ होईल. विमानतळ प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून सध्या कर्मचाºयांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. जर कर्मचारी अविवाहित असेल तर त्याला एकट्याला याचा लाभ मिळेल व विवाहित असेल तर कर्मचाºयाच्या जोडीदाराचा व पाल्याचा यामध्ये समावेश होईल, अशी माहिती भा.का.से.चे चिटणीस संजय कदम यांनी दिली.