विमानतळबाधितांचे होणार पुनर्वसन

By admin | Published: May 26, 2014 03:57 AM2014-05-26T03:57:29+5:302014-05-26T03:57:29+5:30

आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या ग्रामस्थांचा विरोध आता मावळला आहे.

Airport rehabilitation will be rehabilitated | विमानतळबाधितांचे होणार पुनर्वसन

विमानतळबाधितांचे होणार पुनर्वसन

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या ग्रामस्थांचा विरोध आता मावळला आहे. त्यामुळे बाधित होणार्‍या गावांच्या पुनर्वसनासाठी सिडकोने आता कार्यवाही सुरू केली आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रक्रियेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होणार्‍या चार गावांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येणार्‍या पुष्पकनगरच्या प्रस्तावित जागेवर व्ही. राधा यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुनर्वसन फलक लावून या प्रक्रियेचा प्रत्यक्षपणे शुभारंभ केला. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील १० गावांचे पुनर्वसन करण्याचे तसेच त्यांना २२.५ टक्के भूखंड देण्याचे पॅकेज सिडकोने निश्चित केले आहे. विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या १० गावांचे पुनर्वसन सिडको तीन ठिकाणी करणार आहे. त्यापैकी उलवा, गणेशपुरी, कोंबडभुजे आणि वहाळ या चार गावांतील विस्थापितांचे पुनर्वसनाचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या ठिकाणी सिडकोला पुनर्वसनासाठी २० हेक्टर जागा कमी पडत असून, गावकर्‍यांकडून सदर जागा संपादित करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. तर चिंचपाडा पारगाव कोल्ही आणि वाघिवली या चार गावांतील विस्थापितांचे पुनर्वसन करंजाडे येथे करण्यात येणार आहे. कोपर आणि वरचे ओवळे या दोन गावांचे पुनर्वसन नॅशनल हायवे- ४बी लगत सिडकोच्या ताब्यात असलेल्या जागेत केले जाणार आहे. शनिवारी वहाळ येथे नवी मुंंबई आंतररार्ष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन व पुनर्स्थापन क्षेत्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्यासह सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, अधिकारी अरुण देशमुख, अरविंद जाधव, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे नेते रवी पाटील, वहाळचे सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Airport rehabilitation will be rehabilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.