विमान हायजॅक करण्याची धमकी, सर्व विमानतळांवर हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:34 PM2019-02-23T18:34:44+5:302019-02-23T18:40:49+5:30

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. यातच आता एअर इंडियाचे विमान हायजॅक ...

airports across the country on high alert after hijack threat | विमान हायजॅक करण्याची धमकी, सर्व विमानतळांवर हाय अलर्ट

विमान हायजॅक करण्याची धमकी, सर्व विमानतळांवर हाय अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देविमान हायजॅक करण्याची धमकी, सर्व विमानतळांवर हाय अलर्टमुंबईत एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये फोन करुन विमान हायजॅक करण्याची धमकी ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. यातच आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करुन विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.' दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्था आधीच वाढविण्यात आली होती. मात्र, आज मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये आलेल्या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत. यात टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापूर्वी कसून तपासणी आणि गाड्यांची तपासणी तसेच प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग आदींची कडेकोट तपासणीचे आदेश दिले आहेत.

Web Title: airports across the country on high alert after hijack threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.