Join us

मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 10:32 AM

११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता.

मुंबई : भारतीय हवाईदलाच्या सेवेतून काल कारगिल युद्धामध्ये महत्वाची कामगिरी बजावलेल्या मिग-27 या लढाऊ विमानांच्या शेवटच्या तुकडीने निवृत्ती घेतली. ही तुकडी जगातील शेवटची तुकडी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर माजी हवाईदल प्रमुख बी एस धनोआ यांनी मोठा खुलासा केला आहे. 

११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. यावेळी पाकिस्तानला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी हवाई दलाने पूर्ण तयारी केली होती. हवाई दलाची लढाऊ विमाने एअरस्ट्राईकसाठी तयारही ठेवली होती, असा खुलासा धनोआ यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात काल केला. 

आम्हाला माहिती होते की पाकिस्तानात कुठे कुठे दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी आम्ही तयार होतो. परंतू हा राजनैतिक निर्णय होता की पाकिस्तानवर हल्ला करायचा की नाही. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यावेळीही हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र, परवानगी मिळाली नाही. यानंतर 2008 च्या हल्ल्यावेळीही हवाई दलाने तयारी केली होती. मात्र, तेव्हाही आम्हाला परवानगी मिळाली नसल्याचे शल्य धनोआ यांनी सांगितले. 

पाकिस्तान आमच्याविरोधात भ्रम युद्धामध्ये गुंतलेले आहे, यामुळे ते पुढेही हल्ले करतच राहतील. पाकिस्तानने या गोष्टी सोडल्या तर ते इतरांकडून मिळणाऱ्या सुविधा गमावतील, असेही धनोआ यांना सांगितले.

टॅग्स :बी एस धानोआदहशतवादपाकिस्तानभारतीय हवाई दल