Join us

'पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:36 AM

भाजपचे दिवंगत नेते गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. काही दिवसातच पुण्यातील जागेसाठी निवडणूक आयोग पोटनिवडणूक जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी आयोगाने तयारीही केल्याचे बोलले जात आहे. आता या निवडणुकी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाकीत व्यक्त केले आहे. 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मला असं वाटत होत की पुण्याची पोटनिवडणूक लागणार नाही. पण, आता बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक लागणार आहे. मला वाटत होतं की एक वर्ष लोकसभा निवडणुकीला राहिले आहे, त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही, पण आता निवडणूक लागू शकते. 

भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल

'आज इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. रवींद्र धांगेकरांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली. जिथ निवडणूक लागेल तिथे ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी, असंही अजित पवार म्हणाले.

पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे ता. २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसपुणे