Join us

अजय दळवी, नेहा बन्सल यांचे मुंबईत चित्रप्रदर्शन

By admin | Published: November 16, 2016 4:59 AM

दळवीज् आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजय दळवी आणि नेहा बन्सल यांच्या ‘इंटर्नल ग्रेस’ या चित्र प्रदर्शनास मंगळवार (ता. १५)पासून मुंबईतील

मुंबई : दळवीज् आर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजय दळवी आणि नेहा बन्सल यांच्या ‘इंटर्नल ग्रेस’ या चित्र प्रदर्शनास मंगळवार (ता. १५)पासून मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील तसेच बिहारच्या राजपरिवारातील संयोगिता अत्रे, आर्किटेक्ट अविनाश डहाणूकर, आयपीएस अधिकारी एम. के. भोसले, विजय अग्रवाल, विपुल बन्सल, निखिल अग्रवाल हे प्रमुख उपस्थित होते. २१ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. चित्रकलेतील ‘कोल्हापूर स्कूल’च्या परंपरेत दळजी परिवाराचे मोठे योगदान आहे. प्रसिद्ध चित्रकार (कै.) दत्तोबा दळवी, (कै.) जयसिंगराव दळवी यांच्यानंतर अजय दळवी यांनी ही परंपरा नेटाने पुढे नेली आहे. रेषा, आकार, रंग, अवकाश, पोत आणि वेगवेगळे ‘रचनात्मक गंध’ या मूलभूत घटकाद्वारेच अनेक चित्रकारांनी आजवर अभिव्यक्ती केली. हीच अभिव्यक्ती अजय दळवी यांच्या चित्रांतून सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. नेहा बन्सल यांची चित्रे मातृत्वाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे कौतुक या वेळी उपस्थितांनी केले. (प्रतिनिधी)