मुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मेहता हे येत्या ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. आता ते मार्च २०२० अखेरपर्यंत मुख्य सचिवपदी राहतील.मुख्य सचिवांना साधारणत: तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते; पण १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मेहता यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली. १० मे रोजी त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. तत्कालीन मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांना त्या जागी आणले. मेहता यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना महापालिकेत पाठविण्यात आले. मेहता यांच्यानंतर ज्येष्ठतेचा विचार करता सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्य सचिवपदाची संधी असेल.
अजोय मेहता यांना ६ महिने मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:42 AM