Join us

अभिमानास्पद! मुंबईकर अजिंक्य नाईक यांची जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:55 AM

​​​​​​​अजिंक्य नाईक हे २०१५ सालापासून ग्लोबल व्हिलेज नेटवर्कचे सदस्य आहेत. जीव्हीएनच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

मुंबई : मुंबईकर असलेले अजिंक्य नाईक यांची १४० देशांच्या जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ग्लोबल व्हिलेज नेटवर्क हे ग्लोबल व्हिलेज प्रोग्राममधील २ हजार २४९ सदस्यांचे माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क आहे. लेही युनिव्हर्सिटीच्या आयकोका इन्स्टिट्यूटच्या संदर्भात, जीव्हीने गेल्या २३ वर्षांत जगातील १४० देशांतील उद्योग, कायदा, राजकारण, विपणन, आयटी या क्षेत्रांस एकत्र केले. जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यावसायिक, वैयक्तिक मदतसाठी ग्लोबल व्हिलेज नेटवर्क अस्तित्वात आले.अजिंक्य नाईक हे २०१५ सालापासून ग्लोबल व्हिलेज नेटवर्कचे सदस्य आहेत. जीव्हीएनच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आता नाईक २०२०-२०२२ या कालावधीसाठी ग्लोबल व्हिलेज नेटवर्कचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. जीव्हीएनचे माजी अध्यक्ष आयव्हीन मॅजिस्ट्रो हे नाईक यांच्या निवडीबाबत म्हणाले की, नाईक आता पूर्ण क्षमतेने काम करतील. संघाशी संवाद साधत सकारात्मक निर्णय घेतील.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय