Join us

अजिंक्य रहाणेने महाराष्ट्राला केली ऑक्सिजनची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:05 AM

ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळेच अजिंक्य रहाणेने ‘मिशन वायू’अंतर्गत ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत करण्याचे ठरविले आहे.

मुंबई : भारत सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाला सामोरा जात असताना अनेक क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये आता अजिंक्य रहाणेचाही समावेश झाला आहे. रहाणेने खास महाराष्ट्राला मदतीचा हात देताना ऑक्सिजनची होणारी टंचाई कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळेच अजिंक्य रहाणेने ‘मिशन वायू’अंतर्गत ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत करण्याचे ठरविले आहे. ही मदत महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आली असून आवश्यक असलेल्या जिल्ह्यांना ही मदत पुरवली जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआय) या संस्थेच्या वतीने ट्विटरद्वारे रहाणेचे आभार मानण्यात आले आहे.

टॅग्स :अजिंक्य रहाणेकोरोना वायरस बातम्या