'अजिंक्य, वडा पाव म्हणजे बर्गर अन् हॉट डॉगचा बाप'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:46 PM2020-01-10T18:46:57+5:302020-01-10T18:47:58+5:30
मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवत आहे. तो ...
मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवत आहे. तो नुकताच सहपरिवार गावी जाऊन आला. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामध्ये, एका फोटो वडपाव खातानाचा आहे. ट्विटरवर वडापाव खातानाचा फोटो शेअर करत, तुम्हाला कसा वडापाव खायला आवडतो, असा प्रश्न केला होता. त्यावर, भारतरत्न सचिन तेंडुलकरसह स्टँडअप कॉमेडियन आणि क्रिकेट विनोदक विक्रम साठेनेही उत्तर दिलंय.
रहाणेनं शुक्रवारी सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला. त्यात त्याच्या हातात मुंबईचा वडा पाव दिसत आहे. वडा पाव वरून रहाणेनं नेटिझन्सला प्रश्न विचारला आणि त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडून अनपेक्षित उत्तर मिळालं.
अजिंक्यनं विचारलं की, तुम्हाला वडा पाव कसा खायला आवडतो?
1. चहासोबत
2. चटणीसोबत
3. फक्त वडा पाव
त्यावर सचिननं उत्तर दिलं की,
लाल चचणी, थोडीशी हिरवी आणि चिंचाची चटणी... यांचे योग्य मिश्रण वडा पाव टेस्टी बनवतो. तर, विक्रम साठेचंही भन्नाट उत्तर आहे.
वडा पाव हा बर्गर आणि हॉट डॉगचा बाप आहे, असे उत्तर विक्रमने दिले आहे. यासह अनेकांनी वडापावबद्दल आपुलकी अन् जिव्हाळा व्यक्त केलाय.
दरम्यान, टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सुट्टीवर आहे. सध्या, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका होणार आहे. 2018 मध्ये रहाणे अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. ऑसी मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेव्हा रहाणे संघात सहभागी होईल. तत्पूर्वी रहाणे भारत अ संघाविरुद्ध न्यूझीलंड दौऱ्यावर दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी रवाना होणार आहे.
Vadapav is burger aur hot dog ka baap aur isme emotion bhi jyaada hain :)
— Vikram Sathaye (@vikramsathaye) January 10, 2020