Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 08:14 PM2019-03-09T20:14:08+5:302019-03-09T20:28:47+5:30

देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

'Ajit Doval's' Meet' pakistan NSA in thailand, after a half and a half months pulwama incident took in india | Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

googlenewsNext

मुंबई - अजित डोवाल यांच्या कुटुबींयाचे पाकिस्तानमधील उद्योजकांशी संबंध असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवान या वेबपोर्टलवरती 1000 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ह्यांची मुलं. अजित डोवालच्या मुलांच्या कंपनीतील एक पार्टनर पाकिस्तानी, तर दुसरा अरब आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला? मग हा देशद्रोही नाही का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 27 डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे थायलंड येथे भेटले. काय झालं या बैठकीत, हे आम्ही विचारायला नको का. या भेटीच्या महिन्यानंतर देशात युद्धसदृश्य परिस्थिती का निर्माण होते ? या भेटीत काय झालं, काय घडलं, बोलणी यशस्वी झाली की फिस्कटली ? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी डोवाल यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज यांनी तत्कालीन वेब पोर्टलच्या बातम्यांचा संदर्भ देत अजित डोवालबाबत मी काय चुकीचं बोललो असेही म्हटले. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपा आणि नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. तसेच भाजपाच्या आयटी सेलचाही चांगलाच समाचार घेतला आहे. पुलवामा हल्ला, अजित डोवाल, एअर स्ट्राईक, पाकिस्तान, राफेल, डोकलाम, लोकसभा निवडणूक अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केले. मात्र, आपली राजकीय भूमिका लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्पष्ट करण्यात येईल, असेही राज म्हणाले. 

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले याचे कोणतंही दुख: न बाळगता पुढील काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात हसऱ्या चेहऱ्यांनी फिरत होते. कोरियामध्ये जाऊन शांततेचा पुरस्कार घेऊन आले असा घणाघात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केला. यावेळी राज यांनी भाषण करताना नरेंद्र मोदी यांचे विविध फोटो अन् काही व्हीडिओही दाखवले. 

राज यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - 

राफेलची कागदपत्रे चोरीला गेलीच कशी ?
भाजपवाले आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे कोण ? 
अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्या कंपनीचे दोन पार्टनर आहेत त्यातील एक पाकिस्तानी  
सोशल मिडीयातील भाजपकडून होणाऱ्या ट्रोलिंगला भीक घालत नाही
रोज नवीन बातम्या येत असतात, रोज काहीतरी घडावं अन् अगोदरचं मागे जावं हीच सरकारची इच्छा
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर मी आज बोलणार आहे कारण लोकांची स्मरणशक्ती खूप कमी असते
मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नंतर जाहीर करेन, आजच करेन असं नाही
लोकसभा लढवणार की नाही, याचीच चर्चा जास्त, मी पत्रकारांना गेल्या काही दिवसांत भेटलोही नाही
 

Web Title: 'Ajit Doval's' Meet' pakistan NSA in thailand, after a half and a half months pulwama incident took in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.