मुंबई- काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली. या दरम्यान, यांच्यात दोनवेळा बैठका झाल्याचे बोलले जात आहे, शाह यांच्या कालच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेच दिसले नाहीत, त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे
दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजितदादा काल बारामती येथे होते. त्यांच्या बैठका अगोदरच ठरल्या होत्या. त्यांच्या त्या ठिकाणी पाच बैठका नियोजीत होत्या, त्यामुळे ते मुंबईत नव्हते. अजित पवार नाराज नाहीत, असंही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, कालच्या अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी काल बारामती येथे होतो. मी अगोदरच नियोजन करुन बारामतीच्या पाच संस्था, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दुध संघ, बारामती बाजार समिती या सगळ्या संस्थांची वार्षिक बैठका लावल्या होत्या, त्यामुळे मी मुंबईत नव्हतो. मी अगोदरच अमित शहांच्या कार्यालयाला या संदर्भात कळवले होते. अमित शाहांचा दौरा असला, तरी तिथे मी नाही. माझा आधीच दौरा ठरला आहे, असंही अजित पवार म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईतील लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. यानंतर शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर भेट दिली.